पुणे दि ०६ :- पुणे शहरातील कोंढवा पो.स्टे . परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त यांची एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई कोंढवा पो .स्टे . हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नामे ओंकार चंद्रशेखर कापरे वय .२५ वर्ष , रा.अलका निवास , संतगाडगे महाराज शाळेसमोर , कोंढवा खुर्द , पुणे . हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे . त्याने त्याचे साथीदारांसह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता , तलवार , बांबु , ब्लेड या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न , जबरी दुखापत , दुखापत , जबरी चोरी , बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत . मागील ०६ वर्षामध्ये . त्याचेविरूध्द ०६ गुन्हे प .स्टे मध्ये दाखल आहेत . त्याचा गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सरदार पाटील , नेमणूक कोंढवा पो . स्टे . पुणे शहर . यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांचेकडे सादर केला होता . अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दिनांक ०३/०३/२०२१ रोजी एम.पी.डी.ए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे .पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा ऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे . त्यानुसार मागील वर्षामध्ये ११ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले असून चालु वर्षात ०७ सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली असून चालु वर्षात अशा प्रकारच्या अट्टल गुन्हेगारांवर या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे .