पुणे ग्रामीण दि ०७ : – काल मेढ्यात (जि.सातारा) पोलिसांनी गजा मराणेला अटक केली होती.व एमपीडीएअंर्तगत गजाची एका वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांना हवा असणारा पुण्यातील गजा मारणेला मेढा पोलिसांनी काल जेरबंद केले होते. फरार झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते. शनिवारी मेढय़ात तो फिरत असल्याची माहिती मिळताच मेढय़ाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या.तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून पुण्यापर्यंत शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा फरार झाला होता. शनिवारी जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली मेढा शहरात फिरत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणेला काल अटक केली आहे व दि . १५/०१/२०२१ रोजी कारागृहातून सुटून आल्यानंतर त्याने दहशत पसरवून ६ गुन्हे केलेले होते . त्यामुळे तो धोकादायक व्यक्ती असल्याने त्यास एम.पी.डी.ए.कायदयांर्गत १ वर्ष कालावधीकरीता स्थानबध्द करण्याकरीता पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडे सविस्तर प्रस्ताव पाठविला होता त्याचे अवलोकन करून त्याचेविरूध्द स्थानबध्द करण्यासाठी सबळ कारणे पुरावे आढळून आल्यानंतर . जिल्हाधिकारी डॉ.श्री . राजेश देशमुख यांनी दिनांक ०२/०३/२०२० रोजी गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे यास स्थानबध्द करणेकामी आदेश दिलेले होते परंतु गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे हा वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करून लपत होता . दि . ०६/०३/२०२१ रोजी मेढा पोलीस स्टेशन , सातारा जिल्हा येथील सहा . पोलीस निरीक्षक अमोल माने , पो.हवा.जितेंद्र कांबळे , पो.ना. इम्रान मटेकरी , पो.कॉ.अमोल पवार यांना क्रेटा कार नं . हीमध्ये गजानन पंढरीनाथ मारणे व त्याचे ३ साथिदार मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांनी त्यास जिल्हाधिकारी, पुणे यांचे आदेशाप्रमाणे ताब्यात घेवून येरवडा मध्यवर्ती कारागृह , पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. भविष्यात देखील समाजास धोकादायक ठरणारे व्यक्ती , गुन्हेगारी टोळया आढळुन आल्यास त्यांचेवर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे . सामान्य जनतेस गुन्हेगारी टोळयांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे . नमुद गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचेविरूध्द एम.पी.डी.ए.कायदयांर्गत प्रस्ताव तयार करून त्यास स्थानबध्द करेपर्यंत खालील नमुद अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नियुक्त केलेले होते व त्यांनी कार्यवाही केलेली आहे . पौड पो.स्टे.कडील १ ) पो . नि अशोक धुमाळ , २ ) सपोनि विनायक देवकर , ३ ) पोउनि श्रीकांत जाधव , ४ ) पोलीस हवा संदिप सपकाळ , ५ ) पोलीस हवा . शंकर नवले , ६ ) पोलीस हवा . नितिन रावते , ७ ) पोलीस हवा . सुधीर होळकर , ८ ) पो.ना रॉकी देवकाते , ९ ) पो . ना . जय पवार , १० ) पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश पाटील , ११ ) पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख , १२ ) पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गायकवाड , १३ ) पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर जगदाळे , १४ ) पोलीस कॉन्स्टेबल सागर नामदास , १५ ) पोलीस कॉन्स्टेबल नामदेव मोरे , १६ ) पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोईटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.नि.श्री . पद्माकर घनवट , स.पो.नि.सचिन काळे , स.पो.नि. नेताजी गंधारे , पो.स.ई.रामेश्वर धोंडगे , पो.स.ई.अमोल गोरे , पो.स.ई.शिवाजी ननवरे , सहा.फौजदार दत्तात्रय जगताप , दत्तात्रय गिरमकर , शब्बीर पठाण , पो.हवा . महेश गायकवाड , सचिन गायकवाड , निलेश कदम , प्रकाश वाघमारे , सुनिल जावळे , दिपक साबळे , विक्रमसिंह तापकीर , विदयाधर निचीत , ज्ञानेश्वर क्षिरसागर , मुकुंद अयाचीत , राजु पुणेकर , चंद्रकांत झेंडे , सागर चंद्रशेखर , हनुमंत पासलकर , पो . ना . गुरूनाथ गायकवाड , सुभाष राउत , राजू मोमीन , विजय कांचन , जनार्दन शेळके , अजित भुजबळ , मंगेश थिगळे , नितीन भोर , चंद्रकांत जाधव , पो.कॉ.अमोल शेडगे , मंगेश भगत , धिरज जाधव , संदीप वारे , निलेश सुपेकर , बाळासाहेब खडके , प्रसन्न घाडगे , प्रमोद नवले , समाधान नाईकनवरे , अक्षय नवले , अक्षय जावळे , दगडु विरकर यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला आहे .