श्रीगोंदा दि १२:-विसापूर येथे अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर बेलवंडी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून कारवाई केली. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विसापूर गावच्या शिवारात रेल्वे स्टेशन जवळ टपरीमध्ये व विसापूर सब स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बेलवंडी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी छापा मारला असता हॉटेलमध्ये एक जण दारू विक्री करताना आढळला. संजय गोपीचंद गजवाणी असे पकडलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे व दुस-या टपरी मध्ये छापा मारला असता विजय सुरेश शिंदे हे दोघेही रा.विसापूर रेल्वे स्टेशन, ता.श्रीगोंदा हे दारू विक्री करताना मिळून आल्याने ताब्यात घेतले असता टपरीच्या आजू बाजूच्या ठिकाणची झाडा झडती घेतली असता त्या ठिकाणी देशी विदेशी दारू मोठ्या प्रमाणात मिळून आल्याने बेलवंडी पोलिसांनी दोन्ही दारू विक्रेत्यांना दारू विकताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून २० हजार ३०० रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. अवैध देशी विदेशी दारू विकणाऱ्या दोघांविरुद्ध पो.कॉ.संपत मंजाबापू गुंड आणि पो.ना.ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे यांचे फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ.बजरंग गवळी व पो.हे.कॉ. रावसाहेब शिंदे हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.संतोष गोमसाळे, पो.ना.ज्ञानेश्वर पठारे,पो.कॉ.संपत मंजाबापु गुंड,पो.कॉ.सोनवणे म.पो.कॉ.अविंदा जाधव होमगार्ड सचिन काळाणे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे