पुणे दि १८ :- पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे. याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, यांनी माहिती दिली आहे.अनलॉकनंतर अनेक व्यापार्यांमध्ये शनिवार आणि रविवार दुकाने उघडली राहण्यास परवानगी आहे की नाही याबाबत संभ्रम होता.मात्र, आता पुण्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.