पिंपरी चिंचवड :दि.१५ :-एका महिलांकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला हिंजवडी पोलिसांनी केली अटक. ही घटना बुधवारी १४ तारखेला हिंजवडी येथे उघडकीस आली आहे. सुनील बळीराम सरवदे , जय मल्हार नगर, हे दोन दलाल थेरगाव येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार सनी पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी बुधवारी 14 तारखेला त्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील सरवदे आणि सनी हे दोघेजण महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होते. तसेच त्यांना मिळालेली रक्कम आपसात वाटून त्यावर आपली उपजीविका भागवत असताना मिळून आले.पोलिसांनी कारवाई करत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,व हिंजवडी पोलीस तपास करीत आहे