पुणे दि १६ :- पुणे महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यास 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. पुणे महापालिकेच्या अधिकार्यास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.सहाय्यक प्रशासकीय शिवाजी मोरमारे असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी मोरमारे हे शालेय शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत.त्यांनी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नुकतीच 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. यामुळे पुणे पालिकेत खळबळ उडाली आहे,शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे ७८७५३३३३३३क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन. राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी एसीबीकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.