• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दहा हजाराला रोज १५० रु व्याज घेणाऱ्या सावकारावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/08/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत,दि.०५ :- कर्जत पोलिसांनी सावकारकीच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची ही मोहीम शेतकरी,गोरगरीब,मजुर व सर्वसामान्यांसाठी नवजीवन प्रदान करणारी ठरली आहे. कोट्यवधी रुपयांच्या फासातून नागरिकांची सुटका तर झालीच आहे, यादव यांच्या धास्तीने सावकार परस्परच तडजोडी करून आपल्या व्याजाची रक्कम माफ करत आहेत.असे असले तरी सावकारांच्या व्याजाच्या अवैध व्यवसायातील अनेक करामती पाहून पोलीस यंत्रणाही चक्रावून जात आहे.
कर्जत येथील खाजगी सावकार अभि उर्फ बुट्या अनिल पवार याच्याकडून फिर्यादी (रा.अण्णाभाऊ साठेनगर, कर्जत) यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी आठ महिन्यांपूर्वी ६० हजार रुपये (१० हजाराला दिडशे रुपये रोज) याप्रमाणे घेतले होते.प्रत्येक आठवड्याला व्याजापोटी ६ हजार ३०० रक्कमही रोख स्वरूपात सावकाराला देत होते.फिर्यादीने सुमारे ६ महिने व्याजापोटी १ लाख ५१ हजार रुपये दिले.मात्र परिस्थितीमुळे व पैसे न जुळल्याने दोन महिन्याचे व्याज देता आले नाही.आरोपीने प्रत्यक्ष व फोनवर व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला.फिर्यादीने विनंती केली मात्र ‘रोजाच्या पैशाला मी थांबू शकत नसल्याचे सांगत मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत नाहीतर मी तुला बघून घेईन’ असा दम देत होता.त्यानंतर दि.२ रोजी आरोपीने घरी येऊन पैशांची मागणी केली.मात्र ‘आत्ता पैसे नाहीत पैसे आल्यानंतर व्याजासह देईन’ असे त्याला सांगितले मात्र ‘तुझे आत्ता नेहमीचेच झाले’ असे म्हणत फिर्यादी वापरत असलेला हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल (एम.एच.१६ व्ही.३२२७) ही जबरदस्तीने घेऊन गेला. मोटारसायकल माझी नाही, मित्राची वापरत आहे, ती नेऊ नकोस’ असा फिर्यादीने विरोध केला मात्र ‘माझे व्याजासहित पैसे परत दिले तरच तुला मोटारसायकल देईन’ असा दम देऊन बळजबरीने मोटार सायकल घेऊन गेला. कर्जत पोलिसांनी या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ व इतर कलमाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सावकारांनो,नागरीकांना त्रास द्याल तर याद राखा!
‘दिलेल्या रकमेवर अव्वाच्या-सव्वा मनाप्रमाणे व्याज लावून सावकार सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.यात अनेक कुटुंबांची फरफट होत आहे.मात्र कोणत्याही सावकाराने असा त्रास दिल्यास याद राखा अशी कोणतीही तक्रार आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.’
-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत

“अवैध सावकारकीत सावकारांकडून गोरगरीबांच्या,शेतकऱ्यांच्या जमीनीही आपल्या नावावर करून घेण्यात आल्या आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जत पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. सावकरांकडून कोणास त्रास असल्यास कर्जत पोलिसांशी संपर्क करावा. सावकारांना घाबरण्याची गरज नाही, तक्रारदाराला मदत केली जाईल .”
-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका चंद्रकांतदादा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आवाहन

Next Post

मा.आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तिरंग भजन स्पर्धेमध्ये जोगेश्वरी महिला मंडळ व ज्ञानाई भजनी मंडळ यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

Next Post

मा.आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तिरंग भजन स्पर्धेमध्ये जोगेश्वरी महिला मंडळ व ज्ञानाई भजनी मंडळ यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist