पुणे दि,०७:- महाड येथील पूरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ चालू आहे.परंतु कोंढवा येथील नगरसेवक हाजी गफुर पठाण ,मुस्लिम फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने प्लंबर, इलेक्ट्रिशियन ,गॅस शेगडी फिटर,तसेच सुमारे 50 स्वच्छतादुत अशा एका अनोख्या आणि अत्यंत आवश्यक अशी मदत घेऊन हाजी गफुरभाई पठाण पूरग्रस्तांना आदर्श आणि आवश्यक अशी मदत मुस्लिम सामजाच्या वतीने करीत आहेत ती अतिशय समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत आमदार चेतन तुपे यांनी यावेळी व्यक्त केले.पुढे ते म्हणाले की ,आज पूरग्रस्तांना विविध माध्यमातून मदिताचा ओघ चालू आहे .पण तिथे स्वच्छता दुत आणि विविध प्रकारचे आवश्यक असे कारागीर यांची त्याठिकाणी गरज आहे ती गरज ओळखून ती आवश्यक मदत हाजी गफुर पठाण करीत आहेत.असे म्हणाले .राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी म्हणाले की कोंढवा येथील मुस्लिम समाज व मुस्लिम फाउंडेशन नेहमीच समाजासाठी सामाजिक मदत करीत आहेत .यावेळी कोंढवा परिसरातील सुमारे 50 ते 100 विविध प्रकारचे कारागीर आणि स्वच्छता दुत महाड येथील पूरग्रस्तांच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत . यामधे अंबुलन्स, ड्रेनेज व पाणी व इतर ब्लॉक काढण्यासाठी चे जेटींग मशीन ,विविध गरजू वस्तूच्या गाड्या तसेच आवश्यक साधनसामग्री घेऊन नगरसेवक हाजी गफुरभाई पठाण आपल्या पथकासह आज दाखल झाले.