पिंपरी चिंचवड, दि.०७:-अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले. तेथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी देहूरोड शहर शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त भागातील लहान मुला-मुली आणि महिला व पुरुषांसाठी रेडिमेड कपडे, पाणी बॉटल, बिस्कीट, तांदूळ आदी साहित्य मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे सुपूर्द केले.युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, युवासेना तालुका उपधिकारी विशाल दांगट पाटील, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनिल हगवणे, महिला संघटिका सुनंदा आवळे, लक्ष्मीआक्का मिनगी, शिवसेना तळेगाव शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, माजी उपतालुकाप्रमुख बबन पाटोळे, विभाग प्रमुख विजय थोरी, विलास हिनुकले, देवा कांबळे, सुरेश मुळे, महेश डेव्हिड, सुनील भंडारी, विशाल जाधव, शिवकुमार कटारिया, विक्रम भंडारी, सायल, अमर आवळे, युवासेना देहू श्री गणेश मोरे, सॉलोमन भंडारी व इतर शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान, पूरग्रस्तांसाठी मावळ शिवसेना आणि देहूरोड शिवसेनकडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या मदतीबद्दल उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले.