पुणे, दि.२६ : -समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील बोलाई माता मंदीर , जूनी जिल्हा परीषद , पुणे येथे दि १२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ०९/३० वा.चे दरम्यान देवीच्या चांदीच्या दागीन्यांची चोरी गेल्याची घटना घडली होती. या चोरीची घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मौल्यवान चांदीच्या वस्तू चोरणाऱ्या मु.पो.वडजाई , ता.हवेली ( वाघोली ) जि.पुणे येथे राहणारा आरोपींना अटक केली आहे.बोलाई माता मंदीर , जूनी जिल्हा परीषद , पुणे येथे दि १२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ०९/३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील चांदीच्या दागीन्यांची चोरी केली होती. या चोरीची घटना कळल्यावर समर्थ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाल्याने सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते. मंदीरातील चोरी म्हणजे पोलीसांसमोर एक मोठे आव्हान होते.सदरचे आव्हान समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने स्वीकारून सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे चोरी झाली त्याच रात्री पासून अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला होता . सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चोरलेल्या सामानासह पुणे स्टेशन व आसपासच्या भागात फिरला होता . त्यावरून तपास पथकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज , बातमीदार व इतर सर्व प्रकारे रात्रंदिवस तपास करून बातमी प्रमाणे आरोपीचा पुणे शहर व परीसरात आरोपीचा शोध घेतला . फुटेज मधील आरोपीची ओळख पटविण्यासाठी आसपासच्या नागरीकांना फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटवून तपासाची दिशा ठरविण्यात आली.त्या अनुषंगाने दि . २३ ऑगस्ट २०२१ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना बारणे रोड , मंगळवार पेठ पुणे येथे सीसीटीव्ही मधील संशयीत आरोपी दिसून आला . त्यास ताब्यात घेवून त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अनिल हौशिलाल चव्हाण वय -३१ वर्षे , रा मु.पो.वडजाई , ता.हवेली ( वाघोली ) जि.पुणे . असे असल्याचे सांगितले . त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि . १२ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी यांचे बोलाई माता मंदीरामध्ये चोरी केले आसल्याचे सांगीतले.त्याची अंगझडतीमध्ये गुन्हयात चोरी झालेली चांदीची घंटी मिळून आलेने पोलिसांनी जप्त केली आहे.तसेच सदर आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान गुन्हयातील इतर चोरी झालेल्या मौल्यवान चांदीच्या वस्तू पोलिसांनी पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या आहेत . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाचा तपास सपोनिरी . संदीप जोरे हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशीक १ पुणे विभाग,पुणे शहर , प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ शहर , सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे. विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , संतोष काळे , सुभाष पिंगळे , महेश जाधव , सुभाष मोरे , शुभम देसाई , हेमंत पेरणे , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , सुमित खुट्टे , यांनी केली आहे