पुणे, दि.२७ :- पुणे पालिकेच्या वतीने अनधिकृत स्टॉल, पथारी, हातगाडी विक्रेत्य़ांवर कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रिय कार्यालय परिसरात माधव जगताप , उप आयुक्त अतिक्रमण,अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग यांचे नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली आहे . सदर कारवाई लेबर ऑफीस , शासकीय दुध डेअरी , पुणे – मुंबई रोड , भोसलेनगर , एफ.सी.रोड . या परिसरात करण्यात आली खाद्यपदार्थ विक्रेते, गॅस सिलेंडर वापरणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली.कारवाईत 11 स्टॉल, 05 हातगाडी, 05 पथारी, 05 सिलेंडर आणि इतर 19 अशा एकूण 45 जणांवर कारवाई करण्यात आली.
बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.पालिकेने दिलेले परवाने, फेरीवाला प्रमाणपत्र अटी, शर्तींचा भंग करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर/मान्य व्यवसाय न करणे, गॅस सिलेंडरचा वापर अशा विक्रेंत्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणा-या व्य़वसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे पुणे पालिकेने म्हटले आहे.