पुणे, दि.०९ : -औंध परिसरात तीन अनोळखी इसम व त्याचे इतर दोन साथीदार यांनी परिहार चौक , औंध पुणे येथील रिबॉन शॉप कपड्याच्या दुकानाची तोडफोड करत दुकानदाराला. मारहाण हि घटना मंगळवारी रात्री ०९:३० च्या सुमारास घटना घडली. चतुःश्रृंगी पोलिसांनी त्या तीन अनोळखी इसम व त्याचे इतर दोन साथीदार वर गुन्हा दाखल केला आहे परिहार चौक , औंध जाणाऱ्या रस्त्यावर रिबॉन शॉप कपड्याच्या
दुकानाची तोडफोड करत दुकानदाराला. मारहाण केली आहेत.पोलिसांनी माहिती दिली. कि फिर्यादी मिथुन जुन्नरकर , वय -३२ वर्षे , पिंपळे – निलख ,यांचे परिहार चौक , औंध पुणे येथील रिबॉन शॉप यांचे कपड्याचे दुकान असुन त्यांच्या दुकानात तीन अनोळखी इसम व त्याचे इतर दोन साथीदार यांनी दुकानात येवुन, फिर्यादी यांना उधार कपडे मागीतले असता , त्यांनी त्यास नकार दिल्याचे कारणावरून चिडुन जावुन, दुकानाची तोडफोड करत फिर्यादीस शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करुन , भीतीचे वातावरण तयार करुन , सदर भागात दहशत निर्माण केली. व आरोपी तिथून पसार झाले आहे व पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला. व पुढील तपास पो.उप.निरी . मोहनदास जाधव हे करत आहे