श्रीगोंदा,दि.११:- तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीची निवडणूक दि.15 जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती.
या नंतर 8 सप्टेंबर रोजी ढवळगाव ग्रामपंचायत समोर कोरोनाचे सर्व नियम पाळून ग्रामसभा आयोजित केली.यावेळी ढवळगावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिल्पकार बाबासाहेब शिंदे यांची बिनविरोध फेरनिवड तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून माणिक बाप्पू ढवळे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ढवळगावची यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली व आता तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड ही बिनविरोध झाली.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये ढवळगावचे आदर्श गाव म्हणून कौतुक होत आहे. यापुढे सर्वच निवडणुका बिनविरोध करण्याचा मानस ढवळगाव ग्रामस्थांनी केला आहे. याला सर्व ग्रामस्थांचा, तरुणांचा ही प्रतिसाद भेटत आहे.
यावेळी ढवळगावचे सरपंच सारिका रविंद्र शिंदे, उपसरपंच गणेश ढवळे पाटील, माजी सरपंच विजय शिंदे, माजी सरपंच रवींद्र शिंदे,माजी सरपंच तुकाराम बोरगे माजी सरपंच आबा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक्षा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अप्पा ढवळे मेजर, भाऊसाहेब शिंदे मा. उपसरपंच रामचंद्र लोंढे,मा. चेअरमन गौतम वाळुंज,अनिल वाळू़ंज, ग्रामपंचायत सदस्य राहुल बोरगे,ग्रा.सदस्य गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे,काशिनाथ शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार अमोल बोरगे,अंकुश तांबे, ग्रामसेवक माहाडीक मॅडम, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग, प्राथमिक आरोग्य कर्मचारी वर्ग अंगणवाडी कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत शिपाई,पाणीपुरवठा कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे