पुणे, दि.०३:- पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात दि. ३० रोजी पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांनी कळविले की सायली हाईटस फ्लॅट नं. ०७ हिंगणे खुर्द पुणे येथे घरामध्ये चोरी झाली असुन घरामध्ये वयस्कर महिला या जखमी व बेशुध्द अवस्थेत पडलेल्या आहेत. वगैरे खबर मिळाल्याने लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, व तपास पथकाची टीम घटनास्थळावर तात्काळ जावुन पाहणी केली असता महिला नामे शालीनी बबन सोनवणे वय ७० वर्षे रा. सायली हाईटस फ्लॅट नं.०७ हिंगणे खुर्द पुणे या बेशुध्द अवस्थेत पडलेल्या होत्या. घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्यामुळे चोरीतून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.सीआयडी मालिका पाहून या मुलांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शालिनी सोनवणे या हिंगणी खुर्द परिसरात एकट्याच राहत होत्या. 30 ऑक्टोबर 2021 रोजी राहत्या घरात यांचा मृतदेह सापडला होता. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना दोन अल्पवयीन मुलांबाबत माहिती मिळाली होती.पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु यातील एका मुलाला स्वतःच्या घरात चोरी करण्याची सवय असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी खुन केल्याची कबुली दिली.दोन्ही आरोपी 16 आणि 14 वर्षे वयाचे आहेत. शालिनी सोनवणे आणि त्यांची आधीपासून चांगली ओळख होती. त्यामुळे ते दररोज त्यांच्या घरात असायचे. दरम्यान शालिनी यांच्याजवळ चांगले पैसे होते आणि ते कुठे ठेवतात याची माहिती देखील आरोपी नव्हती. त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा प्लॅन आखला. यासाठी त्यांनी शालिनी यांच्या घराची चावी देखील चोरली होती. परंतु घर सोडून कुठेही जात नसल्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती.
यामुळे या दोघांनी पुन्हा प्लान बदलला आणि शालिनी सोनवणे या घरात एकटे असताना चोरी करण्याचे ठरवले. त्यांनी विरोध केला तर त्यांनाही मारण्याची तयारी त्यांनी पूर्ण केले होते.त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी शालिनी घरात एकटी असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. काही वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या सोबत टीव्ही देखील पाहिला. त्यानंतर त्या बेसावध असताना त्यांना खाली पाडले आणि नाक आणि तोंड दाबून त्याचा खून केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पळून गेले. अतिशय शिताफीने त्यांनी हा गुन्हा केला होता. हाताचे ठसे कुठेही दिसू नये यासाठी त्यांनी हातामध्ये ग्लोवस घातले होते.
. सदर घटनास्थळास अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त सो, श्रीमती पोर्णिमा गायकवाड सो , सहायक पोलीस आयुक्त.सुनिल पवार यांनी भेट देवून तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या.सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाची टीम तपास करीत असताना सदर घटनास्थळावर कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शि साक्षीदार नसल्याने घटनेचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन तपास करीत असताना गुन्हयाचे अनुशंगाने वेगवेगळी माहिती तपास पथकाचे टीम समोर येत होती. परंतु कोणताही सबळ धागा दोरा सापडत नव्हता, घटना घडुन ४८ तास झाले तरी देखील पोलीसांना अज्ञात आरोपींचा माग लागत नव्हता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढत चालले होते. व सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले होते. दि. ०२/११/२०२१ रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार, उज्जव मोकाशी यांना घटनास्थळाचे जवळील रोकडोबा मंदिरा जवळ लहान मुलांच्या कडुन माहिती मिळाली की, दि.३०/१०/२०२१ रोजी दुपारी पाणी पुरी खायला जाताना, त्याचे दोन मिञ पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. तसेच त्या मुलांचे घाई गडबडीत जाण्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्याचेकडे सदरच्या माहितीच्या आधारे त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता. सदरची मुले न गडबडता व चेह-यावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवा-उडवीची उत्तरे देत होती सदर मुलांबाबत अधिक माहिती घेता, त्यातील एका मुलाला स्वःताचे घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याबाबत माहिती समोर आली. त्यानंतर सदर मुलांचेकडे पोलिसांनी त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता धक्कादायक माहिती समोर आली व त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल दिली असुन सदर विधीसंघर्षग्रस्त बालकांचे वय १६ व १४ वर्ष, असे असुन त्यांनी मयत महिला नामे शालीनी बबन सोनवणे वय ७० वर्षे रा. सायली हाईटस फ्लॅट नं.०७ हिंगणे खुर्द पुणे. घरात नेहमी येणेजाणे होते व मयत महिलेकडे कायम खुप पैसेअसतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती होती. सुमारे दोन महिन्यापुर्विच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचुन मयताचे घराची चावी चोरली होती. परंतु मयत या वयस्कर असल्याने त्या घर सोडुन कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी घरात मयत एकटया असताना घरात जावुन चोरी करण्याची योजना आखली तसेच मयत महिलेने विरोध केला तर त्यांना मारण्याची ही तयारी केली होती.दि.३०/१०/२०२१ रोजी दुपारी ०१/३० वा सुमारास मयत महिला या घरामध्ये एकटया असल्याबाबत विधीसंघर्षग्रस्त बालकांनी खात्री करुन घरामध्ये प्रवेश केला त्यावेळी मयत महिला या टी. व्ही पाहत होत्या, विधीसंघर्षग्रस्त बालकही टी. व्ही पाहू लागले व मयत महिलेचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलुन देवुन त्याचे तोंड व नाक दाबुन खुण केला. त्यानंतर कपाटातील 93 हजार रुपये रोख रक्कम व 67 हजार 500 रुपये रकमेचे सोन्याचे दागिणे असा एकुण 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. सदरचा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहुन आपल्या हाताचे ठसे कोठे उमटु नये याकरीता हॅण्डग्लोजचा वापर केला होता. बालकांनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिणे त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे.सदरची कामगिरी श्रीमती पोर्णिमा गायकवाड, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. सुनिल पवार, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, देवा चव्हान, सुहास मोरे, इंद्रजित जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बादंल विकास पांडोळे, अमित बोडरे यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे हे करीत आहेत.