पुणे, दि.१२ :- पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी अक्रम गुलाब खान-पाठाण टोळीच्या म्होरक्यासह 5 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. अक्रम गुलाब खान-पठण (वय-25 रा. खान क्लासिक बिल्डींग, नवाजिश पार्क, कोंढवा), मोहंमद सोहेल अझम पंजाबी (वय-21 रा. बैठी चाळ कुबा मस्जिद जवळ, कोंढवा), मजहर ईस्माईल शेख (वय-36 रा. ऐ चाळ, नवाजिस पार्क, कोंढवा), आझम अख्तर पंजाबी (बैठी चाळ कुबा मस्जिद जवळ, कोंढवा), अख्तर उर्फ लड्डु ईस्माईल शेख (वय-18 रा. मक्का मस्जिद जवळ, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे
आरोपींनी कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.या टोळीने अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व परिसरात दहशत पसरवण्यासाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, हप्ते गोळा करणे, खंडणी अशी गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर आतापर्यंत 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत.गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पटेल यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.आयुक्तांची 59 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 59 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील,सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील,पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर गोकुळ राऊत
सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे , अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार जगदिश पाटील, राजेंद्र ननावरे, जगदिश पाटील, रुपनवर यांच्या पथकाने केली.