चोपडा ,दि.१३ :- कंगना रानौत यांनी 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. असे विधान करून स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. रनौत यांनी देशद्रोह केला आहे .म्हणून त्यांचेवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली., तसेच कंगना रानौत यांना भारत सरकार तर्फे देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार महामहीम राष्ट्रपती यांनी परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील यांचे मार्गदर्शनानुसार चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एन एस यु आय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाशय तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरची मागणी केली. महाशय तहसीलदार यांचे वतीने नायब तहसीलदार श्री सय्यद साहेब यांनी निवेदन स्वीकारले. सदरची मागणी वरिष्ठांकडे पाठवीत असल्याचे महाशय सय्यद साहेब यांनी सांगितले. निवेदन देतांना चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, रमाकांत सोनवणे, देवकांत चौधरी, इलियास पटेल, रोहन सोनवणे, हर्षवर्धन पवार, संदीप बोरसे ,अभिजीत देशमुख, धनंजय पाटील ,भोईटे सर आदी उपस्थित होते. कंगना राणावत यांच्यावर तोरणे कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.