जालना,दि२१:-जालना शहरातील जुना मोंढा भागातील लक्ष्मी स्टील हे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडुन नगदी पैसे चोरुन नेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल होता व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासुन गुन्हया संबंधाने विश्लेषण करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, जालना शहरातील जुना मोंढा भागातील लक्ष्मी स्टील हे दुकान रेकॉर्डवरील गुन्हेगार जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक रा.गुरुगोविंदनगर जालना याने त्याच्या इतर साथीदार सह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी रेकार्डवरील गुन्हेगार जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक रा.गुरुगोविंदनगर जालना यास गुरुगोविंदसिंगनगर जालना येथुन ताब्यात घेऊन गुन्हया संबंधाने विचारपुस त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली. आरोपी जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक याच्याकडुन गुन्हयातील गेला नगदी 37 हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहे.आरोपी जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक रा.गुरुगोविंदनगर जालना याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्याचे गुरुगोविंदसिंग नगर जालना येथील घराची झडती घेतली असता घरामधील लाकडी पलंगाच्या खाली लपवून ठेवलेल्या (03) धारदार तलवारी व (01) खंजीर मिळुन आला. त्यावरुन प्रमोद बोंडले, पोउपनि यांच्या फिर्यादवरुन पोलीस ठाणे सदर बाजार, जालना भारतीय हत्यार कायदयाप्रमणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे सदर बाजार, जालना हे करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, प्रमोद बोंडले, दुर्गेश राजपुत, पोउपनि, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, फुलचंद गव्हाणे, रुस्तुम जैवाळ, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाणे, सचिन राऊत महिला अंमलदार मंदा नाटकर चंद्रकला शेडमल्लु यांनी केलेली आहे .
जालना प्रतिनिधी :- भागवत गावंडे