पिंपरी चिंचवड,दि.२३ : – तळेगाव येथे एक 17 वर्षीय मुलावर गोळी झाडून हत्या गोळीबाराची घटना समोर आली आहे. दशांत परदेशी असं मुलाचे नाव आहे. काल सायंकाळी 6 वाजता तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली, शोधकार्य सुरू असताना त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्याला गोळी लागलेली होती. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर तो मृतावस्थेत होता. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचा कोणाशी काही वाद नव्हता असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. मग ही हत्या कोणी आणि का केली? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.