• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

४० हजाराचे ९६ हजार व्याज मागणाऱ्या आणखी एका सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/01/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

२० टक्के प्रतिमाहिना घेत होता व्याज; कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत, दि.०४ :- ‘मी तुला दिलेली ४० हजारांची मुद्दल आणि त्या मुद्दलीचे ९६ हजार व्याज अशी १ लाख ३६ हजार रक्कम दे आणि मगच तुझी बुलेट घेऊन जा’ असे म्हणणाऱ्या कर्जत तालुक्यातील भांबोरे गावातील अव्वाच्या सव्वा वसुली करणाऱ्या एका खाजगी सावकारावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खाजगी व छुप्या सावकारकी क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी ‘सुरेंद्र रविंद्र काजळे व पत्नी (रा.तांदुळवाडी ता.बारामती) यांना डिसेंबर २०२० रोजी कोरोना संसर्ग झाला होता.उपचारासाठी पैशांची गरज असल्याने कोणाकडे पैसे मिळतील का? हे पहात असताना फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणचे संभाजी जाधव यांनी त्यांचे (भांबोरे ता.कर्जत) येथील नातेवाईक सचिन माने यांच्याशी फिर्यादीसोबत ओळख करून दिली होती.पैशांची गरज असल्याने सचिन माने यांनी फिर्यादीला १५ डिसेंबर २०२० रोजी ४० हजार रुपये महिन्याला २० रु टक्के व्याजदराने दिले होते.त्यानंतर फिर्यादीने दोन महिन्याचे १६ हजार रोख दिले होते.त्यानंतर ३१मार्च २०२१ रोजी चतुर्थीनिमित्त फिर्यादी बारामतीहून सिद्धटेक येथे गणपती दर्शनासाठी आले असता खाजगी सावकाराने फिर्यादीची रॉयल इन्फील्ड क्लासिक बुलेट (एम.एच ४२ ए व्ही ६००९) ही गाडी भांबोरे गावातून जात असताना सचिन माने याने त्याच्या चप्पलीच्या दुकानासमोर गाडी अडवली व म्हणाला ‘तू माझ्या पैशांचे काय केले? त्यावर फिर्यादीने एक महिन्याच्या आत पैसे देऊन टाकतो असे सांगितले. पण ‘मला तुझ्यावर विश्वास नाही तु माझे पैसे आणुन दे आणि मगच तुझी गाडी घेऊन जा’ असे म्हणत फिर्यादीकडुन गाडी हिसकावून घेतली.फिर्यादी यांनी बारामती येथील अक्षय अडागळे यास बोलावुन त्यांच्यासोबत घरी निघून गेले.त्यानंतर फिर्यादीकडे पैसे आल्यावर जुन २०२१ मध्ये फिर्यादीने ५० हजार रुपये आणले व ‘आता माझी गाडी मला दे’ अशी विनंती केली मात्र सावकाराने ‘अगोदर दिलेली ४० हजार रक्कम व त्यावर आत्तापर्यंत झालेले ९६ हजार व्याज असे एकुण १ लाख ३६ हजार दे आणि मगच बुलेट घेऊन जा’ असे सांगितले. त्यानंतरही पैशांची जमवा-जमव करून ५६ हजार देत असल्याबाबत फोन केला असता ‘मला १ लाख ३६ हजार दे आणि मगच गाडी घेऊन जा’ असे सांगितले.खाजगी सावकार सचिन माने याच्याकडे सावकरकीचा कोणताही परवाना नसल्याने सुरेंद्र काजळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अपर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल,
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार मारुती काळे, मनोज लातूरकर,भाऊ काळे, गणेश भागडे यांनी केली आहे.

खाजगी सावकारकीची पाळेमुळेच होताहेत नष्ट!
कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी खाजगी सावकारकीचे उच्चाटन करण्यासाठी ‘सावकारकीवरून कुणी त्रास देत असेल तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे.त्यामुळे अनेक सावकारांचे कंबरडे मोडले असुन त्यांनी व्याजात बळकावलेल्या अनेक जमिनीही शेतकऱ्यांना परत मिळाल्या आहेत.त्यामुळे खाजगी सावकारकीची पाळेमुळे आता हळूहळू नष्ट होऊ लागली आहेत

.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे शहरातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार ; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

पुण्यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद, उद्यापासून ‘नो वॅक्सिन, नो एन्ट्री’; अजित पवारांची घोषणा.

Next Post

पुण्यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद, उद्यापासून 'नो वॅक्सिन, नो एन्ट्री'; अजित पवारांची घोषणा.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist