पुणे, दि.०६ :- मुंढवा परिसरात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कारवाई करण्यास पोलिस प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरात हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या पार्टीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर पोलिसांनी आता थेट हॉटेल मध्ये जाऊनच कारवाई केली आहे.यापूर्वी पोलीसांनी कोरोना नियमांचे उल्लंघण करणाऱ्या हॉटेल चालकांना वेळोवेळी नोटीस दिली होती. हॉटेल मालकांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाचा धोका समजून सांगितला होता. इतकं असतानाही मुंढवा परिसरातील काही हॉटेलमध्ये पार्ट्या सुरू होत्या. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री हॉटेलमध्ये जाऊन कारवाई केली.