पुणे,दि. २१ पुण्यातील
अॅमनोरा मॉलमध्ये सुमारे १६० पेक्षा जास्त बालक आणि ५० पेक्षा अधिक शिक्षकांसह बालगोकुलमच्या वतीने योग दिन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यात ७ बालगोकुलमनी भाग घेतला. विशेष म्हणजे यातील २ बालगोकुलम केवळ एका महिन्यापूर्वी सुरू झालेले आहेत आणि योग दिनानिमित्त ३ बालगोकुलम पुन्हा सुरू झाले आहेत.
मागील १५-२० दिवसांच्या सततच्या मेहनतीनंतर झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर रचित जयोस्तुते गीतावर नृत्यही सादर करण्यात आले. शेवटी प्रेक्षकांसाठीही छोटीसी योग आणि ध्यान कार्यशाळा झाली. यात सुमारे १०० जणांनी सहभाग घेतला. उल्लेखनीय म्हणजे कार्यक्रमानंतर तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या सोसायटीमध्ये बालगोकुलम सुरू करण्यासाठी नोंदणी केली