• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम कलम १४४ लागू

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/11/2022
in ठळक बातम्या
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. ७: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हत्यारांचे उत्पादन, विक्रीसाठी साठा व विक्रीस प्रतिबंध करण्यासह समाजविघातक व दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी भ्रमणध्वनी कार्ड विक्रेते, कामगार कंत्राटदार आणि लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांवर निर्बंध घालण्यासाठी २ जानेवारी २०२३ पर्यंत भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार नऊ इंच किंवा त्यापेक्षा जास्त लोखंडी पाते असलेले कोयता, पालघन व तत्सम लोखंडी हत्यार विक्रीसाठी बनवने, विक्रीसाठी साठा करणे किंवा विक्री करणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, हा आदेश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लागू नाही.

सिमकार्ड विक्री करताना ग्राहकांची योग्य पडताळणी व खात्री केल्याशिवाय, सिमकार्ड कार्ड विक्री नोंदवहीमध्ये नोंद घेतल्याशिवाय सिमकार्ड विक्री करता येणार नाही. नोंदवही आपल्या दुकानांमध्ये ठेवून ग्राहकाबाबतची माहिती त्यामध्ये नमूद करावी. नोंदवही अभिलेख स्वरुपात किमान ५ वर्षांकरीता जतन करावी.

कामगार कंत्राटदारांनी आपल्याकडे कामगार कामावर ठेवताना त्याच्या पूर्व चारित्र्याची पडताळणी, त्यांचे कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय त्यांना अवैधपणे कामावर ठेवू नये, त्यांची निवासाची व्यवस्था करु नये. कंत्राटदारांनी कामावर ठेवलेल्या कामगारांची नोंदवही तयार करावी. त्याध्ये कामगारांची वैयक्तिक माहिती नमूद करावी. लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांनी ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र नोंदवहीमध्ये करावी. पोलीस व इतर तपासणी यंत्रणांना आवश्यक त्यावेळी सादर करावी.

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
0000

Tags: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
Previous Post

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Next Post

हडपसर परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा,

Next Post

हडपसर परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा,

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist