मुंबई:१४ ;- पुणे जिल्हयातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे या संदर्भातील सामंजस्य करार मुंबई येथे नुकतेच करण्यात आले आहेत. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे जिल्हयातील वाढती लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, पर्यावरण याबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहयोग व्हावा यासाठी डॉ. आनंद बंग यांच्या पुढाकाराने या क्षेत्रात काम करणाऱ्यासंस्था व कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये लिपिन फाऊंडेशनच्या मदतीने ग्रामीण भागाच्या विकासा करण्यात येईल.बॉश कंपनी वाहतुक शैक्षणिक पार्क ची निर्मीती करण्यासाठी सहकार्य करणार आहे.पोषण आहारासाठीटाटा ट्रस्ट सोबत करार करण्यात आला आहे.मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठीरूबल नागी फाऊंडेशन मदत करणार आहे.आरोग्यासेवा पुरविण्यासाठीपिरामल ही कंपनी, जिल्हा परिषदेतील मुलांना शौचालय उभारण्यासाठी मर्सडीज बेंझ या कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. नॅचरल कॉन्झरवेशन ही जल प्रकल्पात काम करणार आहे. डॉ. सुयोग सोमकुवार हे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटर सुरू करणार आहेत.तरसलाम बॉम्बे या संस्थेमार्फत 10 हजार मुलांना कला कौशल्ये शिकविण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.या सामंजस्य करारामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला आहे.
या करारात जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका तसेच जिल्हा परिषद पुणे यांचा समावेश आहे. या वेळी पुण्याचे पालकमंत्री व अन्न नागरी मंत्री गिरीश बापट, डॉ. आनंद बंग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका यांचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकरी उपस्थित होते.