पुणे,दि.१६:-पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवार (दि.१६) सायंकाळी अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला. अपर पोलीस अपर पोलीस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभाग,महाराष्ट्र राज्य, मुंबई अमिताभ गुप्ता यांचाही यांची बदली त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री काढले आहेत.पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘दिशा’ उपक्रम राबवला. याशिवाय बेसिक पोलिसिंगवर भर दिला. यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच त्यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई केली. यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. व तिहासिक ११४ मोक्का कारवाया करत रचला इतिहासदरम्यान, शुक्रवारी रात्री अमिताभ गुप्ता यांची बदली होऊन रितेश कुमार यांची पुणे शहर आयुक्तपदी नियुक्ती गृह विभागाने केली. रितेश कुमार यांनी(शुक्रवार) सायंकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
पुणे शहर नवीन पोलीस आयुक्तांचा अल्प परिचय
अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पहिले होते. मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ काम केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात ते पोलीस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापुर्वी रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआयडीचे प्रमुख होते. सीआयडीचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी सीआयडी विभागात कर्तव्य बजाविले.
बिनतारी संदेश विभागाचे अत्याधुनिकरण करण्याबरोबर देशपातळीवर सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान वापर असे दोन पारितोषिक मिळवून देण्यात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर गेल्यावर्षी सीआयडीमध्ये बदली झाल्यावर रितेश कुमार यांनी गुन्हे निर्गती वेगवान होण्यासाठी प्रयत्न केले. सीआयडीमध्ये कार्यरत असताना रितेश कुमार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात ही प्रणाली यशस्वीपणे राबविली आहे. त्यासाठी देश पातळीवर त्यांचा आणि सीआयडीमधील इतर अधिकार्यांचा केंद्र सरकारकडून गौरव देखील करण्यात आला होता.