पुणे,दि.०१:- सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाषाण परिसरातील साई चौकात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. चौघांनी एका विद्यार्थ्याचा डावा हात मनगटापासून कापून टाकला. चतुःश्रृंगी पोलिस सतर्कते मुळे जखमीचा जीव वाचला. पोलिसांनी हे कृत्य करणार्यांपैकी दोघांना अटक केले आहे तर
यासंदर्भात आशुतोष अर्जुन माने (24, सध्या रा. दुर्वांकुर 3 पंचवटी, पाषाण. मुळ रा. रेटरे हर्नाक्ष, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पंकज तांबोळी याचा डावा हात मनगटापासून कापला गेला आहे. याप्रकरणी प्रणव काशिनाथ वाघमारे (18, रा. शिक्षक कॉलनी, सुस रोड, पाषाण) आणि गौरव गौतम मानवतकर चतुःश्रृंगी पोलिस वेळेवर पोहचले अन् जीव वाचवला,व दोघांना अटक (20, रा. शिवनगर बस स्टॉप जवळ, तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे गेल्या 2 महिन्यापासून पाषाण परिसरात रहावयास असुन ते सर्वजण सीडॅक ए.सी.टी.एस. या इन्स्टीटयुटमध्ये डॅक कोर्स करीत आहेत. दि. 31 डिसेंबर 2022 रोजी मेस बंद असल्यामुळे आशुतोष माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पाषाण परिसरातील साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. व रोडवर बाहेर थांबले होते. त्यावेळी तेथे मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली.त्यावेळी पंकजने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले. मोटारसायकलस्वारांनी त्यांच्याकडे पैशासाठी जबरदस्ती केली. त्यास पंकजने तीव्र विरोध केला. मुलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आणि थोडयाच वेळात तिथे आणखी दोघेजण आले. चौघांनी एकाने पंकजने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार करण्यास सुरूवात केली. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून खाली पडला.व परिसरातील नागरिक देखील हल्लेखोरांच्या या कृत्यामुळे दहशतीखाली आले.काही क्षणातच घटनास्थळी चतुःश्रुंगी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ पंकजला उपचारासाठी
हॉस्पीटलमध्ये रवाना केले. पोलिसांनी पंकजचे प्राण वाचवले.
पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक यांच्या समक्ष आशुतोष अर्जुन माने यांनी फिर्याद देवून हल्लेखोरांचे वर्णन देखील सांगितले होते. त्यावरून चतुःश्रृंगी पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली.पोलिसांनी आज दुपारपर्यंत परिसरातून प्रणव वाघमारे आणि गौरव मानवतकर यांना अटक केली होती तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते. चतुःश्रृंगी पोलिस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.