नागपूर, दि. २:- महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये ठाणे आणि बृहन्मुंबईच्या संघांनी सुरूवातीच्या पराभवातून माघार घेतल्याने अव्वल मानंकित नागपूर आणि द्वितीय मानांकित पुणे ने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिला संघाच्या उपांत्यपूर्व फेरी ही अशीच होती. नागपूर, पुणे आणि ठाणे यांनी आरामात विजय मिळवला तर बृहन्मुंबईच्या महिलांनी नाशिकला २-१ ने पराभूत करण्यासाठी जोरदार संघर्ष केला.
२०२२ आंतर जिल्हा राज्य चॅम्पियनशिपमधील अव्वल आठ संघ राज्य ऑलिम्पिक खेळांमध्ये सर्वोच्च सन्मान मिळविण्याच्या शर्यतीत आहेत. त्यात दोन अंडर १५ खेळाडू पहिल्या दिवासाचे तारे होते.
१७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या नायशा भटोयेने उपविजेत्या श्रावणी वाळेकरचा २१-२३, २१-१३, २१-१४ असा पराभव करून आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश दिला.
या पूर्वी अनघा करंदीकर आणि तारिणी सुरी यांनी दुहेरीत हेतल विश्वकर्मा आणि वाळेकर यांचया वर २१-१७, २१-१७ असा विजय मिळवून मुंबईला कायम राखले. साद धर्माधिकारी यांनी नाशिकला २१-१७, १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या एकेरीत अनघाचा २१-७ असा पराभव केला.
पुरूषांच्या स्पर्धेत पालघरच्या १४ वर्षीय देव रूपारेलियाने अनुभवी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून मुंबईच्या निहार केळकराचा २१-१६, २१-१९ असा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली.
पण मुंबईच्या पुरूषांनी दुहेरीच्या दोन रबर्स आणि दुसर्या एकेरीमध्ये खूप मजबूत सिध्द केले आणि त्यांनी हा सामना ३-१ असा गुंडाळला.
निकाल (उपांत्यपूर्व फेरी):
पुरुष: नागपूर विरूध्द जळगाव 3-0 (नबील अहमद विरूध्द शुभम पाटील 21-13, 21-14; अजिंक्य पाथरकर/अक्षन शेट्टी विरूध्द दीपेश पाटील/शुभम पाटील 21-13, 21-11; रोहन गुरबानी विरूध्द उमेर देशपांडे, 21-16 २१-१३)
ठाणे विरूध्द नाशिक ३-१ (प्रथमेश कुलकर्णी आदित्य म्हात्रे विरुद्ध २१-२३, २१-१५, २१-२३; अक्षय राऊत/कबीर कंजारकर विरूध्द आदित्य म्हात्रे/विनायक दंडवते २१-९, २१-८; यशके सूर्यवंशी ७-१ 21, 23-21, 21-13 दीप राम्बिया/प्रतिक रानडे विरुद्ध आदित्य आरडे/अमित देशपांडे 21-15, 21-11.
बृहन्मुंबईने पालघरचा ३-१ असा पराभव केला (निहार केळकर देव रुपारेलियाकडून १६-२१, १९-२१; निहार केळकर/विराज कुवळे विरुद्ध आर्यन मकवाना/मोहित कनानी २१-१२, २१-८; यश तिवारी विरुद्ध नितेश कुमार २१-११, 21-17; विप्लव कुवळे/यश तिवारी विरूध्द अर्जुन सुरेश/यश तिवारी 21-14, 21-11)
पुणे विरूध्द सांगली 3-0 (वसीम शेख विरूध्द कार्तिक जेसवानी 21-10, 21-12; जयराज शक्तीवत / नरेंद्र गोगावले विरूध्द निनाद अन्यपनवार / शुभम पाटील 21-13, 21-15; आर्य भिवपत्की विरूध्द निनाद अन्यपनवार, 21-21- ९)