पुणे,दि.०७:- पुणे शहरातील औंध परिसरातील स्पायसर कॉलेज रस्ता येथे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण कारवाई करताना पुणे महानगरपालिकेची पथक कारवाईसाठी गेले असता तेथील दुकानदार यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पथकावर हल्ला केला. यामध्ये जेसीबी चालक तसेच दोन अभियंते यांना मारहाण केली. यावर आक्रमक झालेल्या प्रशासनाने आज दि.०७ रोजी मंगळवारी ही मोहीम तीव्र करत जागा बळकावणाऱ्यांना मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मारहाणीचा निषेध करत. औंध परिसरातील स्पायसर कॉलेज रस्त्यावर ही कारवाई सायंकाळपर्यत सुरू होती. औंध परिसरातील स्पायसर कॉलेज रस्ता येथून मंगळवारी सकाळी कारवाई सुरू झाली. 50 ते 60 हजार चौरस फुटाचे अधिकृत शेड पाडून कारवाई करण्यात आली. इमारतीला लागुन असलेले तसेच
मोकळ्याजागीचे पत्रा शेडवर जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई महापालिका उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त , सहायक आयुक्त, विभागीय निरीक्षक मुख्य खाते कनिष्ठ अभियंता, विभागीय अतिक्रमन अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय कनिष्ठ अभियंता आरोग्य निरीक्षक, बंधकाम विभाग उप अभियंता बांधकाम कनिष्ठ अभियंता बाधकाम असिस्टेंट टूलिप इंजीनियर परिमंडल क्र.चे कनिष्ठ अभियंता क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक अतिक्रम निरीक्षक परवाना व अकाशचिन्ह विभाग पोलिस एसीपी पिआय एपिआय पिएसआय व इतर कर्मचारी सहा अति निरीक्षक कायम सेवक बिगारी ठेकेदार बिगारी – सुरक्षा रक्षक ट्रक/पिंजरा
जे सी बी Gas कटर ब्रेकर या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बिगारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता.
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अज्ञात दुकानदानांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येऊन यापुढे सदर दुकानदारांना तिथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू दिला जाणार नाही असा निर्धार पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकारी यांनीही दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.