पुणे ग्रामीण,दि.१०:- बेकायदेशीर रित्या तलवार व कोयते हातात घेऊन त्यांचे फोटो सोशल मीडियावर दहशत पसरविण्यासाठी विडियो व फोटो बनवत आहेत व दहशतपसरवणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलीसांनी अटक केली आहे दि ०९/०२/२०२३ रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदाराचा फोन आला. की, शिकापुर गावचे हद्दीत महाबळेश्वरनगर मध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मिडीयावर रिल बनविण्याकरीता तीन मुले हातात कोयता व तलवार घेवुन रस्त्यावर फिरत आहेत. अशी बातमी पोलिसांना मिळाल्याने सदर ठिकाणी डिबी पथकातील जे. एस. पानसरे सहा. फौजदार, पोलीस हवा. एस. एस. होनमाने, पोलीस नाईक एम. डी. देवरे पोलीस नाईक ए. आर. नलगे, जयराज देवकर यांना सदर ठिकाणी ताबडतोब पाठविले. व सदर दोन मुलांना त्यांचेकडील एक तलवार व एक कोयत्यासह ताब्यात घेतले. व पुढील चौकशीकरीता शिकापुर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडील अधिक तपास केला असता त्यांची नावे १) ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार, वय २३ वर्षे रा. शिक्रापूर २) दुर्वांश शिवाजी क्षेत्री वय २३ वर्षे, रा. शिक्रापूर ३) दिलावर सुभान शेख रा. , शिक्रापूर अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादेशीररित्या बंदी असताना देखील आरोपींनी हातात तलवार व कोयते घेऊन फोटो काढले व ते सोशल मिडीयावर दहशत निर्माण करण्याचा साठी प्रयत्न केला.नागरिकांनी ही याबदद्ल पोलिसांकडे तक्रार केली होती.
आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसताना त्यांनी हातात कोयता घेऊन फोटो काढले व ते प्रसारीत करण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून एक तलवार व एक लोखंडी कोयते देखील जप्त केले आहेत.पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे
सदर आरोपीवर यापुर्वी गुन्हे दाखल असुन त्यांचेकडुन आणखीण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पुढील तपास आमचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. होनमाने हे करीत आहेत.
तसेच शिकापुर पोलीस स्टेशनचे वतीने आव्हान करण्यात येते की, या पुढील काळात जनसामान्य लोकांमध्ये भिती, दहशत पसरविणेकरीता अथवा सोशल मिडीयामध्ये लाईक व कॉमेट मिळणेकरीता कोयता तलवारीसह रिल बनविल किंवा वाढदिवस साजरा करताना केक कापताना तलवारीचा वापर करेल त्याचेवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करणेत येईल. तसेच शिकापुर पोलीसांचे वतीने सोशल मिडीया व ऑट्सप ग्रुपवर पुढील काळात बारकाईने लक्ष ठेवणेत येणार आहे.
सदरची कारवाई अंकीत गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, यशवंत गवारी, पोलीस उपअधीक्षक, शिरूर विभाग शिरूर यांचे तसेच प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, शिकापुर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमत होनमाने, अमोल दांडगे, पोलीस नाईक मिलींद देवरे, अमोल नलगे, रोहीदास पारखे, विकास पाटील, शिवाजी चितारे, पो. कॉ. जयराज देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांनी केलेली आहे.