पुणे,दि.१७:- पुणे मेट्रोचे बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेत टाकून काही रस्ते बंद करण्यात आले होते. बॅरिकेटमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा होतो म्हणून पहिल्यापासूनच मेट्रोने हे धोरण अवलंबिले आहे की, काम संपेल तसे बॅरिकेड काढून रस्ता मोकळा करणे. फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक तसेच गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक ते रुबी हॉल मेट्रो स्थानक या मार्गांचे ९५% पूर्ण झाले असून या मार्गावरील बरेचसे बॅरिकेड काढून रस्त्यांची रुंदी पूर्ववत करण्यात आली आहे.
शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते दळवी हॉस्पिटल हा रस्ता शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी बदन करण्यात आला होता. शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते दळवी हॉस्पिटल या रस्त्याचे नावीन काँक्रीटीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ह्या रस्त्याची लांबी १७४ मीटर आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक नियमित सुरु झाली आहे.