पुणे,दि.२६:- पुणे शहरातील सारसबागेच्या मागे नाल्याजवळ पर्वती पुणे परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवार दि.१० रोजी छापा टाकून १३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.सारसबाग परीसरात रम्मी पत्त्याचा जुगार खेळत व खेळवत जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोकड आणि जुगाराचे साहित्य असा २२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकूण १३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस अमंलदार, राजेद्र कुमावत, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, ओकांर कुंभार यांनी केली आहे.