मुंबई,दि.१५:- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात. १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू होतील, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले.
लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
कसे असतील दर –
पेट्रोलचे दर 105.82 रुपयांवरून 103.82 रुपयांवर आले आहेत तर .
पावर पेट्रोलचे दर 112.69 रुपयांवरून 110.69 रुपयांवर आले आहेत तर .
डिझेलचे दर 92.35 रुपयांवरून 90.35 रुपयांवर आले आहेत तर .