पुणे,दि.१६:- पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 परिसरात एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली .
दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झालेल्या दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.