पुणे,दि.०६:- पुणे ग्रामीण मध्ये मुळशीतील आंदगाव येथील एका शाळेतील शिक्षकाने 19 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी शाळेच्या उपशिक्षकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापनाला मिळालेल्या माहितीनुसार
गुरूवारी संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले होते.
त्यावेळी 19 विद्यार्थिनींनी सदस्यांना कांबळे विषयी लेखी अर्ज दिला. शाळेतील विदयार्थीनीना लज्जा उत्पन्न होते अशा स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत.
जालिंदर कांबळेला पौड पोलिसांनी लोणी काळभोर येथून अटक. सदरची कमगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, संतोष जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलीस उप निरीक्षक शीतल ठेंबे, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संतोष कालेकर, सिद्धेश पाटील, पोलिस नाईक दत्तात्रय अर्जुन, अनिकेत सोनवणे, रेश्मा साठे, चालक अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.