पुणे, दि.१५ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. ३६ शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १६, २१ आणि २६ एप्रिल,२०१९ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी, ३६ शिरुर लोकसभा मतदार संघ, जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग,निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, तळमजला, पुणे येथे निवडणूक खर्च निरीक्षक उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी, ३६ शिरुर लोकसभा मतदार संघ, पुणे यांनी कळविले आहे.