.पुणे दि ०१ : – महाराष्ट्र राज्याच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (रोहियो) अजित पवार, उपायुक्त (पुनर्वसन) दीपक
नलावडे, उपायुक्त (पुरवठा) निलीमा धायगुडे, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेगाव, पांडुरंग पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्विकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.