पुणे दि,०१ ः-पिंपरीत नेहरुनगर येथे सुरू झालेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत सोमवारी यजमान रोव्हर्स अकादमी संघाला संमिश्र यशाला सामोरे जावे लागले. त्यांच्या अ संघाने विजय मिळविला, तर “ब’ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी रेल्वे पोलिस बॉईज आणि नानरायणगांव हॉकी क्लब संघांनी मोठे विजय मिळवून आपली आगेकूच सुरू केली.
पिंपरीत नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर आज झालेल्या सामन्यात रोव्हर्स अकादमी अ संघाने प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर संघावर 7-0 असा विजय मिळविला. प्रणव माने आणि आदित्य रसाळ यांनी प्रत्येकी दोन गोल केले. प्रणवने पहिल्याच मिनिटाला मिळालेलाय कॉर्नर सत्कारमी लावला. त्यानंतर 42व्या मिनिटाला आपला वैयक्तिक दुसरहा गोल केला. आदित्यने 37 आणि 38व्या मिनिटाला लागोपाठ गोल केले. सुफियान शेख, रोहन डेडे, महंमद साजिद शाह यांनी गोल करुन संघाचे विजयाधिक्य वाढवले.
त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात रेल्वे पोलिस बॉईज संगाने सातारा इलेव्हन संघाचा 10-2 असा धुव्वा उडवला. आकाश सपकाळ याने तीन गोल नोंदवून विजयात मोलाची भूमिका बजावली. तला ओमकार मुसळेने दोन गोल करून सुरे साथ केली. अन्य गोल उदय बारामतीकर, अनिकेत सपकाळ, शकिब इनामदार, रोश मुसळे आणि तेजस कारळे यांनी केले. पराभूत संघासाठी सागर कारंडे आणि आकाश शेवते यांनी गोल केले.
आणखी एका सामन्यात नारायणगाव हॉकी क्लबने यजमान रोव्हर्स अकादमी ब संगाचा 7-1 असा पराभव केला. हृतिक गुप्ता याने हॅटट्रिकसह चार गोल नोंदवून आपली छाप पाडली. अन्य तीन गोल निलेश अभाळे याने केले. रोव्हसचा एकमात्र गोल जयदीरने केला.
स्पर्देचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवर बाबू नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे, हुसेन नबी शेख हॉकी आणि स्पोर्टस फौंडेशनचे आधारस्तंभ फिरोज शेख उपस्थित होते.
———–
निकाल
नारायणगाव हॉकी क्लब 7 (निलेश ाभाळे 6,7,37वे मिनिट, हृतिक गुप्ता 14, 33,45, 60वे मिनिट) वि.व. रोव्हर्स अकादमी ब 1 (जयदीप जी. 43वे मिनिट) मध्यंतर 3-0
रेल्वे पोलिस बॉईज 10 (आकाश सपकाळ 7, 14, 59वे मिनिट, उदय बारामतीकर 19, अनिकेत सपकाळ 25, ओमकार मुसळे 29, 54वे मिनिट, शकिब इनामदार 36वे, रोशन मुसळे 56, तेजस कारळे 58वे मिनिट) वि.वि. सातारा इलेव्हन 2 (सागर कारंडे 26, आकाश शेवते 51वे मिनिट) मध्यंतर 3-1
रोव्हर्स अकादमी अ 7 (प्रणव माने 1, 42वे मिनिट, सुफियान शेख 23, आदित्य रसाळ 37, 38वे मिनिट, रोहन डेडे 50वे, महंमद साजिद शाह 56 वे मिनिट) वि.वि. प्रियदर्शिनी स्पोर्टस सेंटर, खडकी 0 मध्यंतर 1-0)
———–
मंगळवारचे सामने
हॉकी लव्हर्स वि. राजा बांगला क्लब दु. 12.00 वा.
क्रीडा प्रबोधिनी वि. पीसीएमसी इलेव्हन 1.15 वा.
कीड्स इलेव्हन वि. हॉकी पुणे द. 2.30 वा.
पुणे सिटी लाईन बॉईज वि. फ्रेंडस इलेव्हन दु. 3.45 वा.)