.मुंबई दि,१३ :- आपल्या देशात बहुसंख्य लोक आता घरगुुुती LPG गॅस वापरतात. घरातला हा LPG गॅस हाताळताना काय काय काळजी घेतली जावी अशा सूचना वितरकांकडून सतत करण्यात येतात. मात्र एवढे सांगूनही दरवर्षी गॅस सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातल्या त्यात महिलांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. या कारणामुळेच ग्राहक न्यायालयाकडून अशा गॅस कंपन्यांना आपल्या ग्राहकांना विम्याच्या स्वरूपातील मदतीचे आदेश देण्यात आले आहेत.घरातील गॅस कसा वापरायचा, तो वापरत असताना काय काळजी घ्यायची याबद्दल आपल्याला माहित आहे. मात्र घरातल्या गॅस सिलिंडर फुटल्यावर किंवा त्यातून गळती होत असल्यास ग्राहकांना कोणकोणते अधिकार असतात ते आपल्याला माहित पाहिजे. हे आहेत ग्राहकांचे अधिकार …..:LPG गॅस जोडणी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या विमा पॉलिसीअंतर्गत संरक्षण देण्यात आलेले असते, मात्र यासाठी त्यांना कुठलाही वेगळा प्रीमियम भरण्याची गरज नसते. … गॅस सिलिंडरची दुर्घटना घडल्यास एफआयआर कॉपी, दुर्घटनाग्रस्त व्यक्तिवर दवाखान्यात उपचार सुरु असल्याची बिले, मेडिकलची बिले, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पोस्टमोर्टम अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जपून ठेवावीत. गॅस सिलिंडरची दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त व्यक्तीकडून LPG डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातुन मदत मिळण्यासाठी दावा केला जातो, त्यानंतर इन्शुरन्स कम्पनी विम्याची भरपाई रक्कम डिस्ट्रिब्युटरकडे देतात आणि शेवटी ती रक्कम ग्राहकांना वितरित केली जाते.
(प्रतिनिधी-कमलेश नवले, नेवासा)