पिंपरी चिंचवड दि ३० :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. १० मौजे पिंपरी व प्रभाग क्र.१४ मौजे आकुर्डी येथे आज दि.३०रोजी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने
११ दुकानासमोरील अनाधिकृत पत्राशेड( क्षेत्र २०८३.००चौ.फुट ), व १ आर.सी.सी.घर ( क्षेत्र ७००.४०चौ.फुट ) एकुण २७८४.००चौ.फुट बांधकामांवर कारवाई करणेत आली.सदर कारवाई शहर अभियंता श्री. राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्री. शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. नरेश रोहिला, ३कनिष्ठ अभियंता व ४ बीट निरीक्षक, यांचे पथकाने केली. सदर कारवाईस- महानगरपालिका पोलिस- २२, स्थानिक पोलीस- ४, पोलिस ऑफीसर-१, १ डंपर, १ ब्रेकर, २कॉम्प्रेसर ट्रॅक्टर, १० ठेकेदार मजुर, वायरमन-१, आग्निशामक दल, अँब्युलन्स यांचे सहाय्याने करणेत आली.