मुंबई दि,०१ :- प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ. अमोल राजे कोल्हे यांना काल येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ. अमोलराजे कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ बिग्रेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा. संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष Adv.सुहास कदम, Adv.आकाश काकडे, Adv.प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.श्री. कमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोलराजे कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाडले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवूण घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.कार्यक्रमास उपस्थित प्रमुख सदस्य प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा. गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य बांदरगे, प्रा. गोवर्धन भुतंपल्ले, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सोबळे अजीतेश मांडोले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाडे, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर सुरेश भंडारगे, इंस्क्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, व्यवसायी श्री. विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.या पुरस्कार सोहळ्यावेळी आभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर माडताना मला स्वत:ला धन्यता लाभते.आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल तर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभूं महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी