पुणे दि ४ :– पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एलसीबी) शाखेच्या पथकाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ४ ट्रकवर कारवाई करून ४५, लाख बारा हजार रुपयाचा माल जप्त केला आहे. तर चार ट्रक चालकांवर वाळू वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती दिली आहे.कि
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैधरीत्या होत असलेल्या वाळू नेणाऱ्या वर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, श्रीकांत माळी, रवि कोकरे, अनिल काळे, दत्ता तांबे, रवि शिनगारे, ज्ञानदेव क्षिरसागर, नितीन भोर, बाळासो खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने दिनांक ४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ०१.१५ वा. चे सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती गावच्या हद्दीमध्ये कवडीपाट टोलनाक्याजवळ बॅरीकेटचा अडथळा व नाकाबंदी करून १) हायवा ट्रक नं. एमएच-४२ एक्यु १००१ यावरील चालक रमेश शामराव फासगे वय २२ रा. रावणगाव ता. दौंड जि. पुणे २) हायवा ट्र.क नं. एमएच-४२ एक्यु ४१३१ यावरील चालक किशोर तुळशीदास गांधले वय ४० रा.शिरापूर ता.दौंड जि . पुणे ३) हायवा ट्रक नं. एमएच-४२ क्युडब्लू २२१२ यावरील चालक वासुदेव भानुदास शिंदे वय ३४ रा.शिरापूर ता.दौंड जि.पुणे ४) टाटा ट्रक नंबर एमएच-१२ एफझेड ७४२५ यावरील चालक गोविंद रामराव माने वय ४६ रा.आंबेगाव, ता.हवेली जि.पुणे हे त्यांचे ताब्यातील ४ ट्रकमध्ये अनधिकृत, बेकायदा, विनापरवाना एकूण १४ ब्रास वाळू किं.रू.एक लाख बारा हजार राची वाहतुक करीत असताना मिळून आले.त्यांना वाळूचे ट्रकसह एकूण किंमत ४५, लाख बारा हजार राचा मालासह ताब्यात घेण्यात येऊन त्या चारही ट्रक चालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी सदरची वाळू कोठून आणली आहे? याबाबतचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करीत आहेत.