पुणे, दि. १०:-पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी बंडगार्डन पो.स्टे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना व फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना पुणे शहर युनिट २ मधील पो.ना. मॅगी जाधव, यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता नंदलाल शर्मा ऊर्फ चिन्या, वय ३० वर्षे रा रामनगर, बोपखेल पुणे, हा बोटक्लब रोड येथे गावठी पिस्तूलाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्याने, त्या ठिकाणी सापळा लावून त्याला पकडले व त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या जवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल कि. तीसहजार रूपये व एक गावठी बनावटीचे रिव्हॉलवर कि.रू. पंचवीस हजार रुपये व चार जिवंत काडतुसे, कि.रु. आठशे असे एकूण कि.रु. ५५ हजार आठशे रुपये चा मुद्देमाल मिळून आला. कोरगाव पार्क पोलीस गुन्हा दाखल करण्यात आहे. आरोपी हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचेवरती यापूर्वी खडकी व वडगाव मावळ पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त, डॉ शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सपोनि जयवंत जाधव, पोलीस कर्मचारी अनिल ऊसुलकर, यशवंत आंब्रे, दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, मॅगी जाधव, गोपाळ मदने यांनी केलेली आहे.