पुणे, दि.१० :- पुणे शहरातून आज रोजी कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधें व सर्जिकल साहित्य घेऊन बै. जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेचे पथक ४२ डॉक्टरांचे पथक रवाना झाले. यामध्ये औषधवैद्यकशास्त्र, बालरोगशास्त्र, घसाशास्त्र , शल्यचिकित्साशास्त्र,अस्थिव्यंगोपचार शास्त्र , त्वचा रोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र इ. विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा या वैद्यकीय पथकात समावेश आहे- बै. जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे चे मा. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, सर्व विभागप्रमुख व डॉ.हरीश टाटिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य या वैद्यकील पथकाला लाभले आहे. हे ४२डॉक्टरांचे पथक पुरग्रस्तांन मध्ये आजारी रुग्णांची तपासणी करून औषोधोपचार करणार आहेत.