पुणे, दि.१० : – बांधकाम क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल प्रॉपर्टी जंक्शन या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राहुल घोलप यांना चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रिसील रिसर्च या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
कल्पकता आणि उध्यमशीलतेने उद्योजक हे आजच्या युवा पिढीचे आयकॉन आहेत. अशा उद्योगजकांपासून प्रेरणा घेऊन नवीन उद्योजक घडण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास खानविलकर यांनी व्यक्त केला.
हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संस्थेतीळ सर्व कर्मचाऱ्याचा आहे. यापूर्वीच दर्जेदार बांधकाम व ग्राहकांच्या विश्वासावर संस्थेने आयएसओ पुरस्कार पटकावला आहे, असे सत्काराला उत्तर देताना घोलप यांनी सांगितले.