.मुंबई दि १९:- गोवेरी ग्रामस्थ मंडळ , मुंबई या सेवाभावी संस्थेचा विद्यार्थी -पालक- ज्येष्ठ नागरीक यांचा गुण गौरव सोहळा रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ .०० वाजता मंगला हॉल , आर पी.मंगला हायस्कूल, ठाणे (पूर्व) येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.सोहळ्याच्या सुरवातीला प्रमुख अतिथि अभिनेते -दिग्दर्शक मा.महेश्वर तेटांबे , सुरेश डाळे, सौ प्रिया गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथि यांच्या हस्ते
२०१८-२०१९ सालामध्ये भरघोस यश संपादन करणाऱ्या गुणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा शाल ,श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.मनोहर गावडे ,अच्युत गावडे ,सचिन गावडे ,सुनिल गोवेरकर ,भार्गवराम गावडे ,संदीप गावडे ,सुरेश गावडे ,प्रमोद गावडे , सुरेन गावडे ; दिवाकर गावडे ,महेश गावडे,शंकर गावडे , केशव गावडे ,सौ.सोनाली गोडे – गावडे , विशाल गावडे ,राकेश मुळीक आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.मा.महेश्वर तेटांबे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांत विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर पालकांचा सुद्धा आदर केला पाहिजे शिवाय आजची पिढी सोशल मिडियाचा नको तेवढा वापर करताना दिसत आहे त्यामुळे घरा-घरातील सुसंवाद लोप पावत चालले आहेत ही खंत व्यक्त केली.सुरेश डाळे यांनी संस्था चालविणे हे येरा गबाळ्याचे काम नसून त्यासाठी एकजूट आणि सहकार्याची आवश्यकता असते त्याचबरोबर इंटरस्किल सॉल्युशन्सच्या संचालिका सौ.प्रिया गावडे यांनी यशस्वी होण्यासाठी कोणते मार्ग अवलंबले पाहिजेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे यांबाबत विद्यार्थी आणि पालकांना विशेष मोलाचे मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे या सोहळ्यात पालकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील सन्मान करण्यात आला या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन सचिन गावडे यांनी केले.अशा तऱ्हेने हा विद्यार्थी-पालक-ज्येष्ठ नागरीक सन्मान सोहळा सन्मानपूर्वक संपन्न झाला