मुंबईतील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की बोरीवली. विधानसभा क्रमांक १५२ नंबर चा हा मतदारसंघ आहे.
पहिल्याच निवडणुकीत म्हणजे १९६२ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. याचा लोकसभा मतदारसंघ असलेला मुंबई उत्तर जरी बहुभाषिक या मतदारसंघातून विनोद तावडे(भाजपा) हे विजयी झाले आहेत त्यांना 108278 मते मिळाली आहेत. तर पराभूत उमेदवार उत्तम प्रकाश अग्रवाल (शिवसेना) हे आहेत.यांना 29011 एवढे मतदान मिळाले आहे. या मतदारसंघातून बहुतेक वेळा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला आहे. २०१४च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच विनोद तावडे विधानसभेवर निवडून गेले. अर्थात, याआधी देखील २००२, २००८ आणि २०११साली त्यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होतीच तसेच ते कॅबिनेट मंत्री देखील आहेत
बोरिवली विधानसभा मतदारसंघ क्रमांक – १५२
बोरिवली मतदारसंघाचे आरक्षण – खुला ( ओपन)
मतदारांची संख्या
पुरुष – १,६९,४०८
महिला – १,५८,५४७
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) विनोद तावडे, भाजप – १,०८,२७८, २) उत्तमप्रकाश अगरवाल, शिवसेना – २९,०११
३) नयन कदम, मनसे – २१,७६५, ४) अशोक सुतराळे, काँग्रेस – १४,९९३
५) नोटा – २०५६
मतदानाची टक्केवारी – ५४.५७ %
भौगोलिक स्थिती व इतिहास
बोरिवली हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटर वर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे.”बोरीवली” हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाल असा समाज आहे. एक्सर,कांदिवली,शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून आत्ताचं बोरीवली तयार झाला
अटल स्मृती उद्याना’च्या लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला
भारता मधील सर्वात पहिला अटलजीचा पाहिले उद्यान बोरिवली येथे साकार करण्यात मोलाचे काम विनोद तावडे यांनी केले
आहे. काही दिवसापूर्वी बोरिवलीच्या शिंपोली परिसरात मुंबई उपनगराचे पालकमंत्री व बोरिवलीचे आमदार विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अटल स्मृती उद्याना’च्या लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. बाजूलाच मेट्रो रेल्वेचेही स्थानक होणार आहे. या स्थानकास अटल स्मृती उद्यान स्थानक असे नाव द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलताना विनोद तावडे यांनी केली होती.
बोरिवली मतदारसंघ विधानसभा क्रमांक १५२
महत्वाची ठिकाणे
बोरिवलीत अनेक उद्यानांपैकी एक म्हणजे वीर सावरकर उद्यानात सर्व वयोगटाच्या लोकांसाठी करमणुकीची साधने आहेत. बोटिंगसाठी तलाव , जॉगिंग पाथ इ .सोयी आहेत. अनेक जाती-धर्माचे लोक बोरिवलीत राहतात.गणेशोत्सव, नवरात्री, नाताळ,रमजान इ सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरा केंद्र येथील दांडिया-रास प्रसिद्ध आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत
पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास जंगलातले उपनगर असे म्हणले जाते. शहराच्या वेढ्यात वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र “तीनमुर्ती” या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.
वाहतूक व दळणवळण
पश्चिम रेल्वेवरील हे एक महत्वाचे स्थानक आहे.हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात.
संकलन: पत्रकार बाळू राऊत