पुणे, दि.५ :- पुणे शहरात शिक्षक दिनानिमित्त पुणे पोलिसांनी परिमंडळ १ – १७८ परिमंडळ २- २१६ परिमंडळ ३ -१२६ परिमंडळ ४ -१८८परिमंडळ ५ -२१६ शाळां एकुण ८३५ भेटी देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पुणे पोलिस दलाकडून पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त व सर्व परिमंडळीय पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अधिनस्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी ११०० ते १२०० शिक्षकांना शुभेच्छापत्र व पुष्प देऊन सन्मानित केले.
पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी रफी अहमद किडवाई उर्दू
मा आणिज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय याना भेट देऊन शुभेच्छा पत्र व पुष्प देऊन सन्मानित केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्याना सौशल मिडीयाचा वाढता वापर व गैरवापराबद्दल समुपदेशन केले.
कार्यक्रमास के. व्यंकटेशम् पोलिस आयुक्त, गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, परिमंडळ १ च्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, प्रशासन, गुन्हे शाखा व समन्वय अधिकारी कम्युनिटी पोलिसिंगच्या पोलिस निरीक्षक क्रांती पवार, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव,
उपनिरीक्षक आशा गायकवाड, रफी अहमदच्या मुख्याध्यापिका यास्मीन खान, शिक्षक श्री जमादार, सावित्रीबाई फुलेचे मुख्याध्यापक सचिन मार्कट, बाबुराव सणस प्रशालेचे मुख्याध्यापक डी. आर. उंडे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व ७५० विद्यार्थी हजर होते.