• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात रामदास आठवले आणि निवडणुकीच्या काव्यात्मक शुभेच्छा…

भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना आठवलेंनी दिल्या पाठींबा  

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १६ : -पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी त्यांवर रंगत चढवली. ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी,” अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काव्यातून शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारासाठी औंध ते खडकी बाजार अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, चिंतन शहा, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, मुकेश गवळी, परशुराम वाडेकर, विलास पंगुडवाले, शाम काची, सुरेंद्र जी भाटी, अमित बिवाल, अमर देशपांडे, दादा कचरे, योगेश कणनायर, दत्ता सावंत, अजित पवार उपस्थित होते.

“मी इथे आलो आहे सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून देण्यासाठी आणि मी इथून जात आहे तुझ्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांचा बदला घेण्यासाठी,” अशी आणखी एक चारोळी देखील त्यांनी पेश केली व शिरोळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. सिद्धार्थच्या रुपानं तरुण-तडफदार उमेदवार शिवाजीनगर मतदारसंघाला मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना केले.

दरम्यान शिवाजीनगर परिसरात सिद्धार्थ यांच्या प्रचारासाठी एका खास मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये नगरसेविका रेश्मा भोसले आणि शिवाजीनगरमधील कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले. खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक गणेश घोष, समीर धुमाळ, बाळासाहेब दारवटकर, गोपाळ देशमुख या वेळी उपस्थित होते. तर औंधमध्ये आयोजित मेळावा नगरसेवक विजय शेवाळे, पुण्याचे माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Previous Post

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

Next Post

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

Next Post

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist