• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नवले पूल ते कात्रज सहा पदरीकरण कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/11/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१६ :- नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दि १५ रोजी काल केले. वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ५४८ वरील ३.८८ किलोमीटर च्या रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामाच्या कोनशिलेचे अनावरण कळ दाबून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार भिमराव तापकीर, आमदार शिवेंद्र राजे, माजी आ. योगेश टिळेकर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूलासाठी 135 कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी दिली जाईल. तसेच कात्रज येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास होवू नये, यासाठी ध्वनीरोधक यंत्रणा देखील बसविण्याबाबत विचार होईल. नवले पूल ते कात्रज रस्ता सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून 7 मीटर ऐवजी 10 मीटरचा भुयारी मार्ग बनवणे व अन्य आवश्यक कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल. पुणे-सातारा महामार्गाची कामे पूर्ण होण्यात असणा-या अडचणी दूर करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिका-यांसोबत बैठक घेऊन या मार्गाचे काम गतीने मार्गी लावण्यात येईल, असे सांगून श्री गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत असून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून नवी पिढी तयार व्हावी, या हेतूने शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री. तापकीर यांनी मनोगतातून कात्रज, आंबेगाव, न-हे या भागातील नागरिकांच्या समस्या मांडून त्यांच्या सोयीसाठी महामार्गाच्या वाढीव कामांची माहिती दिली.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे प्रास्ताविकात म्हणाले, वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामासाठी ६९ कोटी रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, व्हेहीक्युलर अंडर पास, पादचारी भुयारी मार्ग, नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा , बस निवारा आदी कामे करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, व या भागातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

राज्यात भाजपाशिवाय अन्य कोणी सरकार स्थापन करू शकत नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे – अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

Next Post

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे - अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist