दुधनी दि ०६ : -अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भिमनगर कन्नड शाळेत महामानव डा. बाबासाहेब आंबेडकरांचे ६३ वा महापरिनिर्वाण दिन निमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. संविधान-शिल्पी, महामानव डा. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन देण्यात आला.या अभिवादन कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष्मीपुत्र गायकवाड, मौलाप्पा गायकवाड, रमेश मगी,
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री गौतम कांबळे होते. युवा नेता मौलाप्पा गायकवाड यांनी प्रतिमेचा पूजन केले तर शिक्षण प्रेमी लक्ष्मीपुत्र गायकवाड यांनी ज्योत प्रज्वलन करून अभिवादन दिले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रमेश मगी आणि शरणप्पा म्हेत्रे उपस्थित होते.या वेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच भिमगीतचा कार्यक्रम उपस्थितांचा मन जिंकला. या वेळी मौलाप्पा गायकवाड यांच्या कडून सर्व मुलांना वही आणि पेन दान करण्यात आला. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका तसेच बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र हौदे, शांतमल्लय्या स्वामी, मल्लप्पा कांबळे, सावित्री डोंगराजे, मलिकजान शेख, कलावती अरसगोंड आणि निंगप्पा निंबाळ विश्वनाथ रेवुर तसेच यानी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक श्री गौतम कांबळे यांनी प्रस्तावना केले; शांतमल्लय्या स्वामी यांनी सुत्रसंचलन केले तर मलिकजान शेख यांनी आभार मानले.