पुणे,दि.६:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी एअर कमोडोर राहूल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी(राजशिष्टाचार) अमृत नाटेकर तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर उपस्थित होते.देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले आहे.